नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले

मुंबईत दोन दिवसापासून रुग्ण कमी झाले होते, पण आज पुन्हा रुग्ण वाढले आहेत.
नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले
mumbai Corona Update Saam Tv

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून मुंबईत कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी जास्त होत आहेत. रविवारी १८०३ रुग्ण होते, तर सोमवारी १११८ रुग्णांची नोंद झाली होती. तर आज दिवसभरात १७२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत आतापर्यंत १९,५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत (Mumbai) बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे, आणि पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९६ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.

mumbai Corona Update
मुंबईतील कोरोनाची आजची आकडेवारी दिलासा देणारी, नव्या रुग्णसंख्येत घट

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज सोमवारी दिवसभरात १७२४ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०८३५८९ वर पोहोचली आहे. तर १०५२२०१ एवढे रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत कोरोनाचे एकूण ११८१३ सक्रिय रुग्ण आहेत.

आज महाराष्ट्रात एकुण २९५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या परत वाढली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीतही रुग्णांची वाढती संख्या

सोमवारी दिल्लीत कोरोनाचे ६१४ नवीन रुग्ण आढळले, पण संसर्गाचा दर सात टक्क्यांनी ओलांडला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने शेअर केलेल्या माहितीनुसार, ४ मे नंतरचा हा सर्वाधिक संसर्ग दर आहे. ४ मे रोजी संसर्ग दर ७.६ टक्क्यांहून अधिक होता. तसेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या १९,१३,४१२ वर पोहोचली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com