Mumbai Crime: 'लिव्ह इन पार्टनर'च्या बाळाचा पाच लाखात सौदा

आरोपीची चार दिवस कसून चौकशी केली असता, आरोपीने बाळाचा पाच लाखात सौदा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चिमुकलीला तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोईमतूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam Tv

मुंबई - एक विचित्र घटना व्हीपी रोड पोलीस (VP Road Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका तरुणाने 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरचं बाळ पाच लाखांना विकलं आहे. पीडित तरुणी कामानिमित्त बाहेर गेल्याने आरोपीने या चार महिन्याच्या चिमुकलीवर डल्ला मारला. पोलिसांनी (Police) या प्रकरणी तथाकथित बापासह एकूण अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपीची चार दिवस कसून चौकशी केली असता, आरोपीने बाळाचा पाच लाखात सौदा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चिमुकलीला तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोईमतूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (4 month old baby girl sell in 5 lakh)

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, या चिमुकलीची आई गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. घर मालकीण अन्वरी शेख यांच्या ताब्यात तिने आपल्या बाळाला दिलं होतं. तर संबंधित महिलेचा लिव्ह इन पार्टनर इब्राहिम शेख हा देखील घरीच होता. मागील काही दिवसांपासून घर मालकीण याच या बाळाची काळजी घेत होत्या. पण आरोपीने बाळाला लस द्यायची असल्याचे कारण सांगत बाळाला आपल्या ताब्यात घेतलं.

इब्राहिम बाळाला घेऊन परत न आल्याने घर मालकीण यांनी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी इब्राहिम याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करत दोन महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतलं आहे.

Mumbai Crime
India Corona Cases: देशात 24 तासात 1,94,720 नवे रुग्ण

आरोपींची कसून चौकशी केली असता, त्याने बाळाला तामिळनाडूमध्ये विकल्याची माहिती दिली. त्यानंतर या चिमुकलीला तामिळनाडूच्या कोईमतूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर, 'मीच बाळाचा बाप' असल्याचा दावा करणाऱ्या आरोपी इब्राहिमची डिएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी या चिमुकलीला एका सामाजिक संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com