मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

NCB ने अंमली पदार्थ जप्त करण्याचा सपाटाच लावला आहे.
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 1 कोटीचे अंमली पदार्थ जप्तSaam Tv

सुरज सावंत, मुंबई

मुंबई : NCB ने अंमली पदार्थ जप्त करण्याचा सपाटाच लावला आहे. NCB बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन एक एक करून उघडकीस आणत आहे. बॉलीवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून अटकेत असताना ड्रग्स प्रकरणी रोज नवनवीन राजकारण रंगत आहे. त्याचप्रकारे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. 1 कोटी पेक्षा जास्त किमतीचे चरस अंमली पदार्थ पकडले आहे. माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची कारवाई आहे.

वृत्तसंस्थेनुसार, अंमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. हे ड्रग्स रास्ता मार्गे राजस्थान वरून मुंबईला नेण्यात येत होते. पोलिसांना अंमली पदार्थांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तस्करांना पकडण्याची मोठी मोहीम स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी अमली पदार्थाचा कोट्यवधींचा साठा हस्तगत करीत अनेकांची धरपकड केली आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com