Mumbai Crime Branch: बिल्डरकडून करोडोंची खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीला बेंगळुरुतून अटक

मुंबईच्या मालाड सायबर पोलिसांनी एका बिल्डरकडून करोडोंची खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीला बेंगळुरू येथून अटक केली आहे.
Mumbai Crime Branch: बिल्डरकडून करोडोंची खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीला बेंगळुरुतून अटक
Mumbai Crime BranchSaam Tv

मुंबई : मुंबईच्या मालाड सायबर पोलिसांनी एका बिल्डरकडून करोडोंची खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील एका आरोपीला बेंगळुरू येथून अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मालाडमध्ये राहणाऱ्या एका बिल्डरला मे 2021 मध्ये धमकीचा आंतरराष्ट्रीय कॉल आला होता. त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती (Mumbai crime branch Malad police arrest one accused from Bangalore of International gang).

Mumbai Crime Branch
मुंबई पोलीस कोरोनाच्या विळख्यात; तब्बल 'इतक्या' अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण...

त्यानंतर काही महिने मुंबई क्राईम ब्रान्च (Mumbai Crime Branch) च्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. डिसेंबर 2021 मध्ये बिल्डरने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर मालाड सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला.

तांत्रिक मदतीमुळे बिल्डरला ज्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन कॉल आला, तो बंगळुरुचा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर मालाड (Malad) पोलिसांच्या पथकाने बेंगळुरुला जाऊन आरोपीला अटक (Arrest) करून मुंबईत आणले.

Mumbai Crime Branch
खळबळजनक : व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून साडेसात लाखांची रोकड पळवली!

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश पुजारी उर्फ ​​लंबू आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने बिल्डरला अप्लिकेशन अॅपद्वारे फोन केला होता. मुंबईतून कोणीतरी बिल्डरला धमकीचा फोन करुन विचारणा केली होती. आरोपीला सांगितले होते, ज्याचा पोलीस तपास करत आहेत.

अटक करण्यात आलेला आरोपी हा टेक्निकल मास्टर माईंड असून, सध्या आरोपींना बोलावण्याचे कंत्राट कोणी दिले होते, या टोळीत आणखी किती लोक सामील आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आरोपीची अधिक चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com