Mumbai Crime: दोन महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण; पोलिसांनी २४ तासांच्या आत आवळल्या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या

Baby Kidnapped News: मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी चिमुकलीला तिच्या आईच्या हातात स्वाधीन केलं आणि पालकांनी लहान मुलांकडे लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.
Baby Kidnapped News
Baby Kidnapped Newsसुरज सावंत

Mumbai Crime News: आई-वडील गाढ झोपेत असताना त्यांच्या २ महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण (Kidnapped) झाल्याची धक्कादायक घटनी मुंबईच्या आझाद मैदान परिसरात घडली होती. याप्रकरणी पालकांनी तक्रार केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तसेच चिमुकलीला सुखरुपपणे तिच्या-आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे. (Baby Kidnapped News)

Baby Kidnapped News
Salman Khan : सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये सापडल्या डेंग्यूच्या अळ्या; BMC ने केली औषध फवारणी

मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या दोघांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ३ वाजता या चिमुकलीच अपहरण केले. आझाद मैदान परिसरातल्या झेव्हियर्स हायस्कूल समोरील फुटपाथवर राहणारे हे कुटुंब आहे. या चिमुकलीचे आई-वडील फुटपाथवर गाड झोपेत असताना आरोपींनी २ महिन्यांच्या या चिमुकलीचे अपहरण केले. झोप मोड झाल्यानंतर मुलगी शेजारी नसल्याचे कळताच मुलीच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. तसेच मुलीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळताच पोलिसांनी शोधा-शोध सुरू केली. (Latest Marathi News)

यासाठी पोलिसांनी शेकडो सीसीटिव्ही पडताळले. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती मुलीला कडेवर नेताना पोलिसांना सीसीटिव्हीत दिसला. पोलिसांनी या आरोपीचा सीसीटिव्हीच्या मदतीने माग काढत वडाळामधील संगमनगर परिसर गाठले. अखेर आज सकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी वडाळा संगमनगर परिसरातून मुलीचे अपहरण करणारा आरोपी आणि आणखी एका संशयित व्यक्तीला ताब्यात अटक केली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी ३६३ भादवी कलमांतर्गत गुन्हा (Crime) दाखल केलेला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Baby Kidnapped News
Deepali Sayed: ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद नेमक्या कुणाकडून? रांगोळीतून दिले संकेत

याबाबत मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले, २ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. दिवाळीचा दिवस असताना पोलिसांनी सतर्कता दाखवत ८ पथकांद्वारे शोधाशोध सुरू केली. बुधवारी या मुलीचा शोध लागला. आरोपी मोहम्मद हानीफ याला अटक केली आहे. आरोपी हा पूर्वी मिरारोड त्यानंतर मुंबई सेंट्रल येथे राहणारा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो पूर्वी किटकनाशक औषध विकण्याचे काम करायचा अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच यापूर्वी आरोपीने अशा प्रकारे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यानुसार पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

दरम्यान मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी चिमुकलीला तिच्या आईच्या हातात स्वाधीन केलं आणि पालकांनी लहान मुलांकडे लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com