
Mumbai Crime News: वसईच्या श्रद्धा वालकरसोबत दिल्लीत जे घडलं, तसाच काहीसा प्रकार आता महाराष्ट्रात एका मुलीसोबत घडलाय. विशेष म्हणजे चर्चगेटमध्ये तरुणीची हॉस्टेलमध्ये हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरारोडमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली आणि तिच्या धडाचे अनेक तुकडे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
ही मुलगी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तिच्या खोलीचा दरवाचा उघडल्यानंतर पोलिसांना धडाचे अनेक तुकडे आढळून आले आहेत. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्ट मार्टमरासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Breaking News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत तरुणीचं वय 32 वर्ष असून ती मागील काही काळापासून मनोज नावाच्या ५५ वर्षीय व्यक्तीसोबत मीरा रोड येथील गीता नगरच्या सातव्या मजल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बुधवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळ घराला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यातील काही अवशेष हे गायब करण्यात असल्याचे कळतंय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Breaking News)
आरोपी मनोज आणि मृत मुलगी हे दोघे मागील अनेक महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणं होत होती. याच वादातून मनोजने तिची धारदार शस्त्राने हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करून काही तुकडे फेकून देखील दिले आहेत. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली याबाबतचा अधिकचा तपास नया नगर पोलीस करत आहेत.(Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.