Mumbai Crime News: सहा लाखांच्या गांज्याची करत होती तस्करी, पोलिसांनी सापळा रचून केलं अटक

सहा लाखांच्या गांज्याची करत होती तस्करी, पोलिसांनी सापळा रचून केलं अटक
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

>> संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एक महिलेला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मालाड परिसरात गांजा विक्रीसाठी जात असतानाच महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून तब्बल 20 किलो 210 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ज्याची अंदाजे किंमत सुमारे 6 लाख रुपये इतकी आहे. उषा (३६) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

एक अनोळखी महिला मोठ्या प्रमाणात गांजा विकण्यासाठी मालाड परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.

Mumbai Crime News
Police Recruitment Scam: 'पोलीस भरती'त महाघोटाळा? काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

गुप्त माहितीनुसार मिळालेल्या पत्त्यावर राधाकृष्ण हॉटेल जनकल्याण नगरजवळ सापळा रचून एका 36 वर्षीय महिलेला 20 किलो 210 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली. या गांजाची किंमत सुमारे 6 लाख असल्याचे सांगितले जाते.  (Latest Marathi News)

या महिलेविरोधात मालवणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून सध्या ही महिला मालवणी पोलिसांच्या ताब्यात आहे. या महिलेने गांजा कुठून आणला व ती नेमकी कुणाकुणाला विकते याविषयीचा अधिक तपास मालवणी पोलीस करत आहेत.

Mumbai Crime News
Explainer: RBI ने 2000 च्या नोटा चलनातून बाद का केल्या? 'ही' आहेत 6 मोठी कारणे

एवढेच नाही तर जानेवारी 2023 पासून आतापर्यंत एनडीपीएसचे 35 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ज्यामध्ये 37 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 70 किलो गांजा, 137 ग्रॅम हेरॉईन आणि 35 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत सुमारे 86 लाख रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com