मुंबईतील धक्कादायक घटना; २४ मजली इमरातीच्या टेरेसवर जाऊन मुलीने आयुष्य संपवलं

मुंबईतील २४ मजली इमारतीच्या टेरेसवर १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
mumbai crime news
mumbai crime news saam tv

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईतून (Mumbai) धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुंबईतील २४ मजली इमारतीच्या टेरेसवर १५ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) अपमृत्यूची नोंद केली आहे.

mumbai crime news
सावधान! अवघ्या पाच सेंकदात एटीएम झालं हॅक; बँकांना लाखो रुपयांचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, रिया वैभव ठाकूर असे आत्महत्या केलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे नाव आहे. रिया प्रभादेवीत कामगार नगर सेन्चुरी म्हाडा इमारतीत पालकांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी सव्वा १० वाजण्याच्या सुमारास रिया ही इमारतीच्या टेरेसवर गेली. टेरेसवर जाऊन रियाने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर इमारतीतील नागरिकांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर इमारतीत एकच खळबळ उडाली.

mumbai crime news
धक्कादायक! मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, लोकल ट्रेनमध्ये घुसून महिलेचा विनयभंग

इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशी लोकांनी तातडीने घटनेबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी रियाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. रियाने आत्महच्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी ना म जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com