Crime News: मित्रचं ठरले वैरी! जुन्या भांडणाचा राग, चार अल्पवयीन मित्रांनी मित्राचीच केली भोसकून हत्या

ही मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असायचे, काही दिवसांपुर्वी त्यांच्यात यामुळेच वाद झाला होता. याच वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam TV

Mumbai: जुन्या भांडणाच्या रागातून चार मुलांनी आपल्याच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी मुंबईमध्ये घडली आहे. हत्या करणारे चारही आरोपी अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. ही मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असायचे, काही दिवसांपुर्वी त्यांच्यात यामुळेच वाद झाला होता. याच वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. (Mumbai Crime)

Mumbai Crime
Anjali Damania: 'ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल?' अंजली दमानियांनी भाजपच्या कार्यक्रमातील Videoचं काढला; चित्रा वाघ यांच्यावर टीका

मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई दुबईत कामाला असून वडील मुंबईत राहत होते. या दोघांचा घटस्फोट झाल्याने मुलगा मानखुर्द परिसरात आजोबांसोबत राहत होता. चार जानेवारी सायंकाळी सहा वाजता ही सर्व मुले एकत्र बसली होती. याचवेळी त्यांनी कोयत्याने व चाकूच्या साहाय्याने या १६ वर्षीय बालकाची हत्या केली. पोस्टमॉर्टममध्ये असे आढळून आले की, अल्पवयीन मुलांनी मिळून मृताच्या शरीरावर 14 ठिकाणी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला.

Mumbai Crime
Over Sleeping Problem : रात्रीची झोप घेतल्यानंतरही तुम्हाला दिवसा झोप का येते ? असू शकते गंभीर समस्या

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच हत्या करणाऱ्या ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com