Mumbai Crime News : खेळता खेळता अचानक गायब झाली चिमुकली; सीसीटीव्ही फुटेज पाहून आई-वडिलांना धक्काच बसला!

पाच वर्षीय चिमुकली रविवारी कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील जॉगर्स पार्क परिसरात खेळत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाली.
Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam TV

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या पाठीवर पुन्हा एकदा कौतुकाची थाप पडली आहे.समता नगर पोलिसांनी ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील जॉगर्स पार्क परिसरातून गायब झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्यानंतर अवघ्या अडीच तासाच्या आत शोधून काढले. याप्रकरणी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. मुलगी सुखरूप मिळाल्यामुळे पोलिसांसह पालकांनी देखील सुटकेचा विश्वास सोडला. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कापला पत्नीचा कान, सोलापुरातील संतापजनक घटना

मात्र, मुलीचे अपहरण करणारा पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध आता समता नगर पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुकली रविवारी कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील जॉगर्स पार्क परिसरात खेळत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाली.

यानंतर तिच्या आई-वडिलांनी समता नगर पोलीस (Police) ठाण्यात रात्री साडेआठ वाजता तक्रार दाखल केली. ही घटना काल (रविवारी) घडली असून रात्री मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर समता नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान 363 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवत शोध घेण्यास सुरुवात केली.

गुन्हा नोंद झाल्यानंतर झोन 12 च्या सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी तात्काळ हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी डिटेक्शनच्या पाच टीम तयार करून तात्काळ कामाला लागले. त्यांनी या मुलीचा कसून शोध सुरू केला. त्यामुळे ही मुलगी लवकर सापडण्यास मदत झाली.

Mumbai Crime News
Lavani Dancer : धक्कादायक! लोकप्रिय लावणी डान्सरचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल; बदनामीचा डाव?

पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज (Viral Video) प्राप्त करून उपासाची सूत्रे वेगाने हलवली. परिसरातील नागरिक रिक्षावाले यांनी देखील मुलीचा शोध घेण्याचा कामी सहकार्य केले अखेरीस अपहरणकर्ता मुलीला घेऊन जात असताना काजू पाडा परिसरातील नागरिकांनी त्याला ओळखले त्याला हटकल्यानंतर त्या मुलीला टाकून तो तिथून पळून गेला.

ही बाब नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर अपहृत मुलगी सुखरूप सापडली आहे. मुलीचा शोध लागल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला मुलीला घेऊन पोलिसांनी तिच्या आई-वडिलांकडे तिला रात्री साडेअकरा वाजता सुपूर्द केले मुलगी सापडल्यामुळे आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दरम्यान, अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचे काम आता समता नगर पोलिसांची डिटेक्शन टीम करत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com