Crime News : डेटिंग अँपवरील मैत्री पडली महागात; महिलेकडून उच्चशिक्षित तरुणाला दीड कोटींचा गंडा

सुरूवातील महिलेनं या तरुणाला दोन कोटी वीस लाख रुपये नफा झाल्याचे सांगितलं. मात्र, तरुणाने प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, व्यवहार नाकारण्यात आला
Dating App Fraud Kharghar
Dating App Fraud KhargharSaam TV

Dating App Fraud Kharghar : एका उच्चशिक्षित तरुणाची डेटिंग अँपवरून एका महिलेसोबत ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. त्यानंतर या महिलेनं तरुणाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवलं. या अमिषाला बळी पडत तरुणाने युएसबी कॉइन एक्सचेंज आणि बिनान्स अँप डाउनलोड करून त्यात तब्बल एक कोटी साठ लाख रुपये गुंतवले. (Latest Marathi News)

Dating App Fraud Kharghar
हृदयद्रावक! खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा; श्वास अडकल्याने तडफडून मृत्यू

सुरूवातील महिलेनं या तरुणाला दोन कोटी वीस लाख रुपये नफा झाल्याचे सांगितलं. मात्र, तरुणाने प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, व्यवहार नाकारण्यात आला. याची चौकशी केली असता युएसबी कॉइन एक्सचेंज हे ॲप बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या विरोधात खारघर पोलीस (Police) ठाण्यात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा उच्चशिक्षित असून तो खारघर येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाचा एका डेटिंग अँपवरून एका महिलेसोबत ओळख झाली होती. आपण फिलिपिन्स या देशातील असल्याचं सांगत, या महिलेनं तरुणाला गुंतवणूक करण्याचं अमिष दाखवलं.

Dating App Fraud Kharghar
Shraddha Walkar Case : आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? पोलिसांना लोकेशन समजलं; पण...

या अमिषाला बळी पडत तरुणाने युएसबी कॉइन एक्सचेंज आणि बिनान्स अँप डाउनलोड केलं. इतकंच नाही तर त्याने त्यात तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची गुंतवणूक देखील केली. गुंतवणूकीच्या काही दिवसानंतर या महिलेनं तरुणाला २ कोटी २० लाख रुपयांचा नफा झाला असल्याचं सांगितलं.

दरम्यान, तरुणाने हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरून व्यवहार नाकारण्यात आला. याबाबत तरुणाने अधिक चौकशी केली असता. युएसबी कॉइन एक्सचेंज हे ॲप बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपली फसवणूक  (Crime News)  झाल्याचं लक्षात येताच, त्याने खारघर पोलिसांत धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर भामट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com