Crime News: धक्कादायक! कपाटात आढळला महिलेचा मृतदेह; मुलीनेच हत्या केल्याचा पोलिसांचा संशय

इमारतीमधील एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती समोर आली होती, ज्यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaamTv

Mumbai: मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात लोखंडी कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. रात्री उशिरा पोलिसांना कंपाउंडमधील एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरातून येत असलेल्या उग्रवासानंतर छाननी केली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Mumbai News
St News: सरकारच्या घोषणेनंतर तिकिट दरात 50 टक्के सवलत का नाही? एसटी कंडक्टरला मारहाण

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले. त्यावेळी घरात शोध घेताना महिलेचा मृतेदह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता आणि तो सडलेल्या अवस्थेत होता.

Mumbai News
Employees Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचा दणका; थेट परिपत्रकच काढलं, मोठी कारवाई होणार?

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तसंच महिलेच्या मृत्युच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत." दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे. (Mumbai News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com