Crime News : दोनच दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या मोलकरणीने केलं भयंकर कृत्य; मुंबई येथील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेला केली अटक
Crime News
Crime NewsSaam Tv

संजय गडदे

Andheri News : जर तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधान! कारण मोलकरीन तुमच्या आयुष्याच्या पुंजीवर डल्ला मारू शकते.असाच एक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंधेरी पूर्वेकडील पूनम नगर परिसरात घडला.

धीरज वैभव इमारतीत राहणाऱ्या फिर्यादी यांच्या घरात दोनच दिवसापूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरीणमुळे चांगलाच फटका बसला. दोनच दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या मोलकरणीनेच घरातील आयुष्यभराच्या पुंजीवर डल्ला मारला. (Latest Marathi News)

Crime News
Maharashtra Politics: 'मुख्यमंत्रीपद हे शिंदेंच्या बेईमानाचं बक्षिस...' कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तीवाद; भावनिक आवाहनाने शेवट

मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील पूनम नगर महाकाली केज रोड परिसरातील धीरज वैभव इमारतीत एका जोडप्याच्या घरात काम करण्यासाठी नव्याने मोलकरीण ठेवण्यात आली होती.

मात्र याच मोलकरनीने कपाट तोडून तब्बल तीनशे तीन ग्राम वजनाचे सोने ज्याची अंदाजे किंमत सोळा लाख 51 हजार पाचशे रुपये आणि रोग रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन फरार झाली होती याविषयीची तक्रार एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी यांनी स्वतः दिल्यानंतर पोलिसांनी कलम 381 भादवी नुसार गुन्हा दाखल करून घेतला.

Crime News
Devendra Fadnavis: माझ्या कुटुंबियांना गोवण्याचा प्रयत्न झाला, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तपासासाठी एक पद्धत तयार करून तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी महिलेने जी रिक्षा पकडली होती, त्या रिक्षाचा ठाव ठिकाणा शोधत आरोपी महिला शिवडी परिसरात असल्याचे समजतात तपास पथकाने महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यानंतर महिलेला अटक करून तिच्याकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सध्या महिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com