Mumbai Crime News : कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वारंवार फोन, संतापलेल्या कर्जदाराच्या कृत्याने अख्खी कंपनी हादरली

Crime news : फायनान्स कंपनीला धडा शिकवण्यासाठी एक व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
Mumbai NEws
Mumbai NEwsSaam TV

Mumbai News :

ऑनलाईनच्या जमान्यात फायनान्स कंपन्यांचा सुळसुळात वाढला आहे. काही तासात या फायनान्स कंपन्या गरजूंना कर्ज पुरवतात. मात्र कर्जफेड वेळेत न केल्यास कंपन्यांकडून येणारे फोन आणि कर्जवसुलीसाठी वसुली एजंटकडून केली जाणारी अरेरावी अनेकदा समोर आली आहे. कर्जाचा हप्ता थकला म्हणून वारंवार फोन करणाऱ्या अशाच एका फायनान्स कंपनीला धडा शिकवण्यासाठी एक व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

मुंबईतील एका व्यक्तीने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता न भरल्याप्रकरणी कंपनीकडून हप्त्यासाठी वारंवार फोन केला जात होता. (Latest Marathi News)


Mumbai NEws
Rain Alert in Maharashtra : राज्यात आज कसा असेल पाऊस? पुण्यासह ६ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

सतत येणाऱ्या फोनमुळे संतापलेल्या व्यक्तीने कंपनीला धडा शिकवण्यासाठी थेट कंपनीच्या एमडीला मेल करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर कंपनीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलिसांनी आरोपी विनय नडे याला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai NEws
Kalyan News: अत्यंत लाजिरवाणं! गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांचा नकार; प्रवेशद्वारावर दिला बाळाला जन्म

विनयने तक्रारदार यांच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा ८४५ रुपयांचा हप्ता न भरल्याने त्यांना फायनान्स कंपनीकडून फोन केले जात होते. संतापलेलया विनयने कंपनीच्या मेलवरच कंपनीच्या एमडींना बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली. पोलीस अधिक तपास करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com