Mumbai Crime News: टास्क फ्रॉड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीस अटक करून 1.36 कोटी रक्कम केली फ्रिज

Task Fraud Case: टास्क फ्रॉड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीस अटक करून 1.36 कोटी रक्कम केली फ्रिज
Task Fraud Case
Task Fraud CaseSaam Tv

>> संजय गडदे

Task Fraud Case:

मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी देखील अशाच एका टास्क फ्रॉड सायबर गुन्ह्याचे उकल करून आरोपीस अटक केली आहे.रियाज उद्दीन अब्दुल सुभान अहमद (26 वर्ष ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ओशिवरा पोलिसांनी आरोपीच्या खात्यातील तब्बल 1.36 कोटी रुपये गोठवले आहेत.

पोलिसांनी आरोपीला वरळी भागातून अटक केली आहे. आरोपीने 200 पेक्षा अधिक लोकांची टास्क फ्रॉड चे काम देण्याच्या नावाखाली फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपीच्या खात्यात गोठवण्यात आलेली रक्कम ही ज्या व्यक्तींना फसवून जमा करण्यात आलेली आहे,अशा तक्रारदारांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

Task Fraud Case
Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवरा परिसरात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबर वरून एक संदेश प्राप्त झाला यात तुम्ही शॉपिंग साइटवर जास्त असता ॲमेझॉन तर्फे 150/- रु चे गिफ्ट दिले जाणार आहे यासाठी तुम्हाला पाठवलेल्या करून नोंदणी करावी लागेल असे सांगितले म्हणून फिर्यादी यांनी ती लिंक ओपन करून वैराग सिंथॉल नावाचे टेलिग्राम अकाउंट ओपन करतात फिर्यादी यांच्या बँक खात्यात दीडशे रुपये जमा झाले.  (Latest Marathi News)

त्यानंतर आरोपीने फिर्यादीस बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केल्यास डबल कमाई होईल त्यासाठी दुसरी लिंक पाच हजार रुपये भरण्यास सांगितले.एक टास्क देऊन त्याना 6500/-रुपये दिले. अशाप्रकारे बिटकॉइन मध्ये केल्यास अल्पावधीतच डबल रक्कम मिळेल असे सांगून फिर्यादींची टास्क च्या नावाखाली 6,75,000/-रुपयाची ऑनलाइन फसवणूक केली. यासंदर्भात फिर्यादी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवली.

Task Fraud Case
India vs Bharat Row: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी कलम 419,420,34 भा द विसह 66(C)(D) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्याचे व. पो.नि. मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शिवाजी भांडवलकर (तपास अधिकारी), सायबर सेलचे अधिकारी पो.उप.नि दिगंबर कुरकुटे, पो. ह.31474 /अशोक कोंडे, पो. शि. क्र.130165/ विक्रम सरनोबत पो. शि. क्र.130182/ अनिल पाटील या तपास पथकाने गुन्हयाचा तपास करत असताना आरोपी वापरत असलेले बँकेसोबत पत्रव्यवहार करून खात्यातील तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपये इतकी रक्कम गोठवण्यात यश आले आहे.

सायबर सेल पथकाचे पोलीस उप निरीक्षक कुरकुटे व स्टाफ यांनी तांत्रिक तपास करून आरोपी रियाज उद्दीन अब्दुल सुभान अहमद (26 वर्ष) यास वरळी येथून अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी Asus कंपनीचा लॅपटॉप, 2 मोबाईल फोन, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड,चेक बुक पासबुक आधार कार्ड व पॅन कार्ड हस्तगत केले आहे.

सध्या आरोपी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात असून त्याने नेमकी किती नागरिकांची फसवणूक केली आहे या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत आहेत. शिवायगोठवण्यात आलेली रक्कम ही ज्या व्यक्तींना फसवून जमा करण्यात आलेले हे अशा तक्रारदारांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com