मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी ओला कॅब चालकाला अटक

१५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला कॅब चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
mumbai Crime News
mumbai Crime News Saam Tv

मुंबई : १५ वर्षीय मुलीचा विनयभंग(Molesting ) करणाऱ्या ओला कॅब चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चालकाला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरे पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा (crime ) दाखल करण्यात आलात होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे . (Mumbai Crime News In Marathi )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोरेगावमध्ये २९ वर्षीय ओला कॅब चालकाने २५ मे रोजी अल्पयीन मुलीचा अश्लील हावभाव करत विनंयभग केला होता. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या मदतीने आरे पोलीस ठाण्यात आरोपी ओला कॅब चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत आरोपी ओला कॅब चालकाला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी मुळचा बिहारचा असून नाव मुरारी कुमार सिंग आहे. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहे का, याची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पांचाळ यांनी सांगितली आहे.

mumbai Crime News
Menstrual Hygiene : १ रुपयात मिळणार १० सॅनिटरी पॅड; ग्रामविकास मंत्रालयाची मोठी घोषणा

दरम्यान,२५ मे रोजी मुंबईतील गोरेगाव येथे २९ वर्षीय ओला कॅब चालकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील हावभाव करत विनयभंग केला होता. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.तसेच याआधी साकीनाकामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यावेळी नराधमाने पीडित महिलेवर अमानुष अत्याचार केले होते.हे साकीनाका प्रकरण ९ सप्टेंबर २०२१ रोजी घडलं होतं. त्यानंतर पोलीस यंत्रणा महिला सुरक्षा सतर्क झाली होती. दरम्यान, गोरेगावमधील घटनेमुळं मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com