Mumbai Crime News : फिल्म व्यावसायिकाच्या घरी फिल्मी स्टाईल दरोडा; बंदूक सारख्या वस्तूचा धाक दाखवून घरात घुसले अन्...

व्यवसायिकाच्या घरात एखाद्या चित्रपटातील दरोड्याच्या दृष्याप्रमाने दोन चोरांनी दरोडा टाकल्याचे नुकतेच समोर आले आहे.
Mumbai Police Crime News
Mumbai Police Crime NewsSaam TV

Mumbai Crime News : मुंबईच्या ओशिवरा इंडस्ट्रीज भागात राहणाऱ्या एका फिल्म व्यवसायिकाच्या घरात एखाद्या चित्रपटातील दरोड्याच्या दृष्याप्रमाने दोन चोरांनी दरोडा टाकल्याचे नुकतेच समोर आले आहे.

यासंदर्भात फिल्म व्यावसायिक संतोष रवीशंकर गुप्ता यांनी बांगुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी तीनही आरोपी चोरांना 48 तासात अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police Crime News
Crime News : वहिनीला घरात एकटं बघून दीराची नियत फिरली; केलं संतापजनक कृत्य, काळीमा फासणारी घटना

गोरेगाव पश्चिमेकडील ओशिवरा इंडस्ट्रीज जवळील धीरज रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या फिल्म व्यावसायिक संतोष रविशंकर गुप्ता यांच्या घरी आठ जानेवारी रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान दोन चोर जबरदस्तीने घरात घुसले. यानंतर त्या दोघांनी गुप्ता यांच्या घरातील नोकर विकास चौधरी याचे दोन्ही हात दोरीने बांधून बंदूक सारख्या वस्तूचा धाक दाखवून त्याच्याकडून चावी घेऊन चोरी (Robbery) केली.

Mumbai Police Crime News
Navi Mumbai Crime Branch : मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून रिक्षा चोरणारी टोळी गजाआड

यावेळी या दोन्ही चोरांनी कपाटात असलेले 40 लाख 9 हजार रुपयांची रोकड व बारा ग्राम सोने चोरून नेले यासंदर्भात फिर्यादी संतोष गुप्ता यांनी बांगुर नगर लिंक रोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.दिलेल्या तक्रारीवरून कलम ३९२, ४५४, ३८०, ५०६, ३४ भादवि अन्वये नोंद करण्यात आला होता.

गुन्हेगारांविषयीही कोणतीही माहिती नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि गुप्त माहिती प्राप्त करून अवघ्या 48 तासात तीनही आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात बांगुर नगर लिंक रोड पोलिसांना यश मिळाले आहे या तिघांकडूनही पोलिसांनी (Police) चोरी गेलेले 40 लाख 9 हजार रुपये जप्त केले आहे या संदर्भात बांगुर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com