Mumbai Crime: मुंबईत मस्तान गँग सक्रिय; दहशत माजवणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

त्याने हातात तलवार घेऊन रील बनवून न्यायाधीशाच्या मुलीला शिवीगाळ देखील केली होती.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam TV

संजय गडदे

Mumbai Crime : मुंबईत वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. शुक्रवारी एका गुंडाने एमआयडीसी पोलिसांची झोप उडवली. या गुंडाने तलवार घेऊन एक रील बनवली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. या व्हिडिओमधून सर्वत्र दहशत पसरली, लोकांना घाबरवण्यासाठीचं त्याने ही रील बनवली होती. त्यामुळे अंधेरी मरोळ परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दशत माजवणाऱ्या या गुंडाला अटक केली आहे. (Latest Andheri Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या ( 23 वर्ष )असं अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी परिसरातील अहमद दाऊत चाळीत तो रहायचा. आतापर्यंत त्याच्यावर १५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला एमआयडीसी पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं. मात्र तडीपारी संपण्या अगोदरच तो पुन्हा मरोळ परिसरात आला.

Mumbai Crime
Crime Video : अग्निपरीक्षा ! माझे अनैतिक संबंध नाहीत; खरं सांगूनही दिली भयंकर शिक्षा

त्यानंतर हातात तलवार घेऊन त्याने एक रील बनवली आणि तो पुन्हा पोलिसांना आव्हान देऊ लागला. यासंदर्भात खबऱ्याकडून एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले. शहादा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याला मस्तान कंपनी नावाने मुंबईत दहशत माजवायची होती.

Mumbai Crime
Mira Road Crime News : हजारो सीसीटीव्ही कसून तपासले आणि उलगडली जबरी चोरी

यासाठी त्याने मुंबईच्या मरोळ परिसरात दहशत देखील माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने हातात तलवार घेऊन रील बनवून न्यायाधीशाच्या मुलीला शिवीगाळ देखील केली होती. शिवाय पोलिसांना देखील आव्हान दिले होते. त्यामुळे सापळा रचत पुन्हा एकदा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com