Andheri Crime News: भररस्त्यात महिलेचा विनयभंग; अंधेरी पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Andheri Crime: अंधेरी पोलीस ठाणे हद्दीत रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.
Andheri Crime News
Andheri Crime NewsSaam TV

संजय गडदे

Mumbai Crime News: महिला आणि मुलींसाठी सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराचे नाव सर्वात पुढे आहे. महिला आणि लहान मुलांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करताना मुंबई पोलीसांनी आपली एक छाप सोडली आहे. (Latest Crime News)

अंधेरी पोलीस ठाणे हद्दीत रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याच प्रकरणात अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संतोष कुमार विश्वनाथ गिरी (४२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Andheri Crime News
Nagpur Crime News: किळसवाणं कृत्य! पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचे रक्त; घटनेमागे हात कुणाचा?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार 16 मे रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी महिला अंधेरी पूर्व सहार रोड येथून पायी चालत असताना अज्ञात व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला. याबाबत महीलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम ३५४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व.पो.नि.संताजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.(गुन्हे) शिवाजी पावडे, तपास अधिकारी पो. उ.नि.मन्मथ तोडकर, पो.उ.नि. अमित यादव तपास पथकाने गुन्हा घडलेल्या परिसरातील 70 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातील संशयास्पद आढळून आलेल्या व्यक्ती बाबत चौकशी केली असता तो वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याचे समजले. अंधेरी ते गोरेगाव दरम्यानच्या रेल्वे प्रवास आणि त्यानंतर वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

Andheri Crime News
Bihar Crime News: वहिनीच्या प्रेमात पार आंधळा झाला; सख्ख्या भावावरच झाडल्या गोळ्या

वनराई पोलीस ठाणे येथील गुप्त बातमीदाराला आरोपीचा फोटो दाखविला असता त्याने वनराई येथील एका कोकाकोला कंपनीत नोकरी करत असल्याचे समजले. नंतर तपास पथकाने त्वरित कंपनीत जाऊन त्याविषयीची चौकशी केली असता तो रेल्वेने गुजरातला जाणार असल्याचे समजतात त्याला बोरिवली स्थानकातून ताब्यात घेण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com