Mumbai : कस्टम विभागाची मोठी कारवाई; विमानतळावरून ६१ किलो सोन्यासह ७ आरोपींना केली अटक

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ३२ कोटी किमतीच्या ६१ किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे.
mumbai crime news
mumbai crime newssaam tv

Mumbai Crime News : मुंबईत विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ३२ कोटी किमतीचे ६१ किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये २ महिलांचा सामावेश आहे. मुंबई कस्टम विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा इतकी मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

mumbai crime news
Kalyan News : मानवी वस्तीत सापांचा सुळसुळाट; भक्षाच्या शोधात किंग कोब्रा थेट तेलाच्या कारखान्यात

कस्टम विभागाच्या माहितीनुसार, ४ भारतीय प्रवासी टांझानिया देशातून आले होते. या प्रवाशांनी सोने लपविले होते. या चौघांकडे २८. १७ कोटी किमतीचे ५३ किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. टांझानियातून येताना दोहा विमानतळावर सुडानी नागरिकाने एका कंबरेचा पट्टा दिला. त्यांची विचारपूस केल्यावर चौघे प्रवासी टांझानियातून आल्याचे कळले.

या चार प्रवाशांनी शरीराला चारी बाजूने सोन्याची बिस्किटे गुंडाळली होती. या चौघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केले की, त्यांना अनोळखी सुडानी नागरिकाने दोहा विमानतळावर सोन्याची बिस्किटे दिली. दरम्यान, या सुडानी नागरिकाने त्यांच्यासोबत प्रवास केला नाही. या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या चौघांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

mumbai crime news
Crime News : सिगारेट आणली नाही म्हणून मित्राची हत्या; डोंबिवली येथील धक्कादायक प्रकार

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी देखील सूत्रांच्या माहितीमुळे मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या तीन प्रवाशांकडून (एक पुरुष आणि दोन महिला) ३ कोटी ८८ लाखांच्या किमतीचे ८ किलो सोने जप्त केले. या तीन प्रवाशांध्ये एक महिला ६० वर्षीय होती. या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com