दिवसा ढवळ्या वकिलावर तलवारीने वार; पहा Video

...या हल्ल्या दरम्यान वकील सत्यदेव जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिवसा ढवळ्या वकिलावर तलवारीने वार; पहा Video

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडाल्याची टीका गेल्या काही वर्षात अनेकवेळा झाली आहे. आता त्यात दिवसाढवळ्या तलवारीने केलेल्या हल्ल्याच्या घटनांची भर पडत आहे. वादग्रस्त जमिनीची केस लढत असलेल्या वकीलावर भरदिवसा भररस्त्यात तलवारीने हल्ला (Attack on lawyer in Mumbai) करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी दहिसर पश्चिम कंदारपाडा येथे घडली आहे.

या हल्ल्या दरम्यान वकील सत्यदेव जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अनेक जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

सत्यदेव जोशी असे हल्ल्यात जखमी झालेल्या वकिलांचे नाव आहे. सत्यदेव जोशी हे कांदरपाडा येथील एका वादग्रस्त जमिनीबाबत आपल्या क्लायंटच्या बाजूने न्यायालयात सूट फाईल करणार होते. त्यासाठी रविवारी दुपारी ती जमीन पाहण्यासाठी आलेल्या २० ते २५ जणांच्या जमावाने सत्यदेव जोशी यांच्यावर तलवार, लोखंडी सळई, बांबूने हल्ला केला आणि यात ते जखमी झाले.

दिवसा ढवळ्या वकिलावर तलवारीने वार; पहा Video
पुण्यातील हॉटेल ‘गारवा'च्या मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

या हल्ल्यानंतर हल्लरखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी वकील जोशी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून इतरांचा शोध पोलिस घेत आहेत. मुंबईत वकीलावर झालेल्या हल्ल्याचा वकील संघटनांनी जाहिर निषेध केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com