Breking News : मुंबई च्या धारावीत सिलेंडरचा स्फोट; 15 जण जखमी

धारावी परिसरातील शाहू नगर मधील कमला नगर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास हि घटना घडली आहे.
Breking News : मुंबई च्या धारावीत सिलेंडरचा स्फोट; १४ जण जखमी
Breking News : मुंबई च्या धारावीत सिलेंडरचा स्फोट; १४ जण जखमी ANI

मुंबई : धारावी परिसरातील शाहू नगर मधील कमला नगर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास हि घटना घडली आहे. BMC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार धारावीतील मुबारक हॉटेल जवळ हे कमलानगर असून येथील एका घरात हा स्फोट झाला आहे.

हे देखील पहा -

या घटनेत लागलेल्या आगीची तीव्रता इतकी होती कि, आसपासच्या चार पाच घरांचे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

सदर घटनेत 15 लोक जखमी झाले असून 5 जण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना सायन येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या स्फोटाची तीव्रता आणि मोठा आवाज झाल्यामुळे परिसरात काही काळ धावपळ निर्माण झाली होती. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com