Mumbai : धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर; आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले 'हे' निर्देश

अति धोकादायक इमारतींबाबत प्राधान्यक्रम यादी निश्चित करून मुंबई पोलिसांच्या सहकार्याने तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
representative photo
representative photosaam tv

सुमित सावंत

मुंबई : मुंबईच्या कुर्ल्यात इमारत कोसळल्यानंतर मुंबई (Mumbai) आणि उपनगरात अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई आणि उपनगरात दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणी सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. तसेच अति धोकादायक इमारतींबाबत प्राधान्यक्रम यादी निश्चित करून मुंबई पोलिसांच्या सहकार्याने तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. (Mumbai News In Marathi )

representative photo
OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत; राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची पटोलेंची मागणी

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष असून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष कुमार शर्मा हे मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनात पावसाळ्या दरम्यानच्या एका विशेष बैठकीचे आयोजन आज सायंकाळी करण्यात आले होते.

मुंंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी हे विशेषत्वाने उपस्थित होते.

representative photo
'या' १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर; असा असेल कार्यक्रम

प्रत्यक्ष व दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला मार्गदर्शन करताना मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी निर्देशित केले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सदर इमारती रिकाम्या करून घ्याव्यात.

त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी देखील सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी. या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अति धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आवश्यक असणारे सहकार्य महानगर पालिकेला तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे आवर्जून नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com