Mumbai Fire News: नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

Fire In New Mumbai : आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Fire In New Mumbai
Fire In New Mumbaisaam tv

>> सिद्धेश म्हात्रे

New Mumbai Fire News: नवी मुंबईत रबाळे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आर-447 प्रशांत थर्मो प्लास्टिक कंपनीला ही भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की उंचच्या उंच धुराचे लोळ दिसत आहेत.

याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ज्या कंपनीला ही आग लागली ती केमिकलची कंपनी असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Fire In New Mumbai
Elephant Project : व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबवणार, हत्ती संवादकाची मदत घेणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

रबाळे एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानाने सांगितले की, "रबाळे एमआयडीसी परिसरातील अँथनी गॅरेजजवळील केमिकल कंपनीत मोठी आग लागल्याची माहिती आम्हाला 4.45 वाजता आपत्कालीन अग्निशमन कॉल प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही दोन फायर इंजिन आणि 10 अग्निशमन दलाच्या गाड्यासह प्रशांत थर्मो प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड दाखल झालो". (Mumbai Fire)

Fire In New Mumbai
Video: धक्कादायक! 30 रुपयांसाठी मेडिकल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण! CCTV फुटेज व्हायरल

तसेच "सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या धुराने भरून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्या दिली. (Mumbai News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com