
सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : तुम्ही मासे खवय्ये आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या समुद्राला बेभान उधाण आले आहे. मात्र, असे असताना देखील मच्छिमारांच्या जाळ्यात मासळीच सापडत नाहीत. यामुळे मच्छिमारांसह मासे खवय्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)
यावर्षी 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली असली तरी समुद्रात आलेल्या विविध संकटांमुळे मासेमारीचा हंगाम वाया गेला आहे. सध्या समुद्राला उधाण असले तरी नवी मुंबईसह (Navi Mumbai) रायगडच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने नौका परतल्या आहेत. रायगडच्या समुद्रात मासळीचा मोठा तुटवडा असून मासळीचे उत्पादन कमालीचे घटले आहे.
सध्या रायगडच्या समुद्रात छोटी मासळी देखील मिळणे दुरापास्त झाले असून सुरमई, रावस, पापलेट, जिताडा, घोळ अशी मोठी मासळी डोळ्यांनाही दिसेनाशी झाली आहे. मासळीचे उत्पन्न 50 टक्क्याहून अधिक घसरले असल्याने मासळी खवय्यांच्या ताटातून मासळीच गायब होण्याच्या मार्गांवर आहे.
मासळीची आवक घटल्याने मासळीचे दर देखील गगनाला भिडलेत. यामुळे मासे खवय्ये ग्राहकही मासळी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. शासनाकडूनही दुर्लक्ष होत असून ऐन मौसमात मासे का मिळत नाही याच प्रश्नाचे उत्तर खलाश्यांना सापडेनासे झाले आहे.
मासळीच्या शोधात गेलेला दर्याचा राजा आता खाली हात परतत असून यामुळे मासे खवयांच्या ताटातील मासळीच दुर्लभ होत चालली आहे.
मासे खवय्यांची चिंता वाढली
मासळींची (Fish) आवक घटल्याने मासळीचे दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मासळी खाणाऱ्या खवय्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. मासळीचे भाव वाढल्याने मासे खाणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.