मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांची मोठी प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेना नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
kishori pednekar
kishori pednekarSaam tv

सुमित सावंत

मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांकडून शिवसेना पक्षावर दावा केला जात आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. त्यानंतर 'धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत त्यांनी काम काय केले हे दाखवले आहे. पण त्यांच्यासोबत काय झाले, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेना नेत्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( kishori pednekar news)

kishori pednekar
Jitendra Awhad : गरज पडली तर राजभवनात घुसू; कोश्यारींना पळवून लावू : जितेंद्र आव्हाड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मालेगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'आम्ही ठाण्याचं राजकारण लांबून बघत होतो. अगदी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठाण्याच्या राजकारणात ढवळाढवळ केली नाही. अन्याय होत होता तर गेली २५ वर्ष का शांत बसला. जर मोठा स्फोट करणार असाल, तर लवकर करा स्फोट करा. शिवसेना पक्षाबरोबर ठाकरेंचे नाते यांना तोडायचं आहे. जे समोर येईल, त्याला सामारे जाऊ'.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. केदार दिघे म्हणाले, 'मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार... मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात ? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com