Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश; मुलीचा मृत्यू!

मुंबई मधील धारावी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने आपले दात घासले आहेत.
Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश; मुलीचा मृत्यू!
Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश; मुलीचा मृत्यू!Saam Tv

जयश्री मोरे

मुंबई: मुंबई Mumbai मधील धारावी Dharavi परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने Brush With rat killing paste आपले दात घासले आहेत. पण लगेच तिला पेस्टची चव वेगळी लागल्याने मुलीने तोंडातील पेस्ट थुंकली आणि तोंड धुतले. परंतु काही सेकंदातच उंदीर मरण्याचे औषध तिच्या शरीरात पसरल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात Dharavi Police station आकस्मिक मृत्यूची Accidental death नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

अप्साना खान असं मृत पावलेल्या १८ वर्षीय मुलीच नाव आहे. संबंधित घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर या मुलीने उंदीर मारण्याच्या विषाने दात घासले. पण न कळत तिने टूथपेस्ट समजून विष Poison ब्रशवर घेतलं आणि थेट दात घासण्यास Teeth Brush सुरुवात केली. मात्र चव Taste वेगळी लागल्यानंतर हा प्रकार समोर आला. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. पण त्यानंतर तिच्या पोटात दुखू Pain In Stomach लागले. यामुळे तिला पोटदुखीची औषध देण्यात आले पण त्याचा काहीच उपयोग झालं नाही.

Mumbai: टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश; मुलीचा मृत्यू!
नाशिक: पोलीस शिपायाने केलं अल्पवयीन मुलीचे अपहरण!

तर आपली आई ओरडेल म्हणून तिने ही बाब आपल्या आईपासून लपवून ठेवली. पोट दुखीचे औषध घेऊनही वंदना काही थांबल्या नाहीत म्हणून तेव्हा तिने आपली आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्वरित तिला मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आणि डॉक्टरांनी तिची ECG आणि सोनोग्राफी केली. त्यानंतरही पुढील उपचारासाठी तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन दिवस उपचार केल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी त्या मुलीने अखेरचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्या त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com