Highway Accident: समृद्धी, मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचा मुद्दा विधिमंडळात; 'समृद्धी'बाबत फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv

मुंबई: समृद्धी महामार्ग आणि मुंबई-गोवा माहामार्गावरील अपघातांचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित झाला. समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली.

ओव्हरलोड गाड्यांच्या मुद्द्यांवर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, महामार्गावर जिथे एंट्री होते, तिथेच गाडीतील प्रवाशांची तपासणी केली जाईल. जास्त प्रवासी असतील, तर अडवले जाणार असल्याचे सांगितले.

Samruddhi Mahamarg
Govt Employee Strike: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम, उद्यापासून 19 लाख कर्मचारी संपावर

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं की, महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे अनेक अपघात होत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण राहण्यास अनेक कारणं आहेत. गोव्यापासून ते राजापूरपर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण झालं आहे. पण रायगड आणि रत्नागिरीमध्ये काम अपूर्ण आहे. (Latest News)

Samruddhi Mahamarg
Crime News: डेटिंग अॅपवर प्रेम जुळलं, ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या फ्लॅटवर मृत्यू; हवाई सुंदरीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

आज या संदर्भात कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींची बैठक लावण्यात आली होती. नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा या महामार्गासंदर्भात लक्ष घालून सूचना केल्या आहेत. या महामार्गाच काम करणारी पूर्वीची कंपनी ही कोर्टात गेली आहे.

कामासाठी खर्च केलेल्या पैशांची मागणी करत आहे. त्यावर शासन आता तोडगा काढत आहे. येत्या 9 महिन्यात या महामार्गाचं काम पूर्ण करण्यासाठी आणि कामावर देखरेखीसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com