Mumbai-Goa Vande Bharat Express: कोकणवासीयांसाठी गुड न्यूज! 5 जूनपासून कोकण मार्गावर 'वंदे भारत' धावणार, PM मोदी करणार लोकार्पण

कोकणवासीयांसाठी गुड न्यूज! 5 जूनपासून कोकण मार्गावर 'वंदे भारत' धावणार
Mumbai-Goa Vande Bharat Express
Mumbai-Goa Vande Bharat ExpressSaam Tv

Mumbai-Goa Vande Bharat Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मार्गावर 5 जूनपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहे. पंतप्रधान मोदी गोव्यातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे स्वागत करतील.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Odisha Train Accident: ओडिशात भीषण रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक, 132 जखमी

ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल.  (Latest Marathi News)

यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Wrestlers Protest: 'ब्रिजभूषण सिंह यांना 9 जूनपर्यंत अटक करा, नाही तर..' राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ५ जून २०२३ पासून नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.

चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस येथे थांबणार

मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com