Mumbai Gold Smuggling: मुंबई एअरपोर्टवर पत्नी, बाळासह उतरले, झडतीनंतर अधिकारी चक्रावले; अंतर्वस्त्रात सापडलं १.०५ कोटींचे सोनं

Gold Smuggling: हवाई विभागानं ११ सप्टेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली.
Mumbai Gold Smuggling
Mumbai Gold SmugglingSaam Tv

Mumbai Gold Smuggling:

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका कुटुंबाला हवाई गुप्तचर विभागानं अटक केलीय. सिंगापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाची तपासणी केल्यानंतर हवाई गुप्तचर विभागानं त्यांच्याकडून दोन किलो २४ कॅरेट सोन्याच्या ४ पुड्या जप्त केल्या.

या सोन्याची किमत तब्बल १.०५, २७,३३१ कोटी इतकी आहे. हे कुटुंब सिंगापूरहून परत होते, त्यावेळी मुंबई विमानतळावर त्यांना रोखण्यात आलं आणि त्यांच्याकडून तस्करीचं सोने जप्त करण्यात आले आहे. हवाई विभागानं ११ सप्टेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. एआययूच्या अधिकाऱ्यांनी एपीआयएस प्रोफाइलिंगच्या आधारे इंडिगो फ्लाइट 6E 1012 सिंगापूर ते मुंबई आणि चेन्नई दरम्यान प्रवास करत होतं.

दरम्यान सोन्याची तस्करी करणारे कुटुंब सिंगापूर ते मुंबई असा प्रवास करत होते. तस्करी करणारे कुटुंब मुंबई विमानतळावर उतरलं असताना हवाई गुप्तचर विभागानं या कुटुंबाला थांबवलं. त्यानंतर या कुटुंबाची तपासणी केल्यानंतर या व्यक्तीनं स्वस्ताच्या अंतर्वस्त्रात आणि दोन वर्षाचा मूलगा आणि पत्नीच्या डायपरमध्ये सोन्याच्या पावडरची पूड लपवली होती. दरम्यान पोलिसांनी पुरुष आणि महिलेला न्यायिक कारागृहात पाठवण्यात आलं आहे.

आणखीन एका घटनेत डीआरआयनं सोन्याची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आलीय. तस्करी करणारा व्यक्ती हा दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास करत होता. आरोपीकडून जवळपास साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं. सलीम सगीर इनामदार (४३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा रायगड जिल्ह्यातील असून तो सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Gold Smuggling
Vande Bharat Train: मुंंबई-पुणे मार्गावरील इतर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारतचे प्रवास भाडे महाग, जाणून घ्या किती?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com