Mumbai: पत्नी बोलत नाही म्हणून, पतीने केली पत्नीची धारदार शस्त्राने हत्या!

मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या आर सी एफ पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगर मधे एक पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.
Mumbai: पत्नी बोलत नाही म्हणून, पतीने केली पत्नीची धारदार शस्त्राने हत्या!
Mumbai: पत्नी बोलत नाही म्हणून, पतीने केली पत्नीची धारदार शस्त्राने हत्या!जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या आर सी एफ पोलीस स्टेशन RCF Police Station अंतर्गत राहुल नगर मधे एक पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. Husband Killed Wife पत्नी आपल्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून ही हत्या केली आहे. पोलिसांनी Police आरोपी पती अक्षय आठवले याला अटक केली आहे.

हे देखील पहा-

नेहमीच वाद होत होते वाद;

मृत महिला आकाक्षा (वय 21) वर्षे ही धारावीतील एक खासगी रुग्णालयात स्वागतीका म्हणून काम करत होती. आरोपी अक्षय आठवले याच्याशी 2019 मधे लग्न केले होते. त्यानंतर त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. म्हणून ही महिला गेल्या काही महिन्यांपासून आपल्या घरी वेगळी राहू लागली होती.

रिक्षा अडवली आणि...;

अक्षय तिच्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याच्याशी बोलत नव्हती हा राग मनात धरून काल (ता.10) नोव्हेंबरला ही महिला सकाळी रिक्षाने कामाला जात होती त्यावेळी अक्षय मोटारसायकलवर आला आणि त्याने रिक्षा अडवली आणि हातातल्या धारदार शस्त्राने तीच्यावर वार केले.

Mumbai: पत्नी बोलत नाही म्हणून, पतीने केली पत्नीची धारदार शस्त्राने हत्या!
'त्या' ट्वीट प्रकरणी माफी मागा अन्यथा...; अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना नोटीस

आरोपीला पतीला अटक;

तिला जखमी अवस्थेत सायन च्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केले पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आर सी एफ पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com