जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, बुडालेल्यांपैकी दोघे सख्खे भाऊ

ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
जुहू बीचवर पाण्यात खेळताना तीन जण बुडाले, बुडालेल्यांपैकी दोघे सख्खे भाऊ
Mumbai Juhu BeachSaam Tv

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जुहू चौपाटी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुहू चौपाटीवर (Juhu Beach) फिरायला गेलेल्या मुलांना पाहण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात पोहण्यासाठी उतरताच तीन जणांचा (Three Boys Drown) बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलातील कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या बुडालेल्या तिन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे. (Mumbai Juhu Beach Three Boys Drown Including Two Brothers)

Mumbai Juhu Beach
अमरावतीतील भयंकर घटना! अल्पवयीन मुलीला पेढ्यातून गुंगीचं औषध दिलं; त्यानंतर...

आनन सिंह (वय 21), कौस्तुभ गुप्ता (वय 18) आणि प्रथम गुप्ता (वय 16) असे बुडालेल्या मुलांची नाव आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील कौस्तुभ आणि प्रथम हे दोघेही सख्ख्ये भाऊ असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरू केली. मात्र मंगळवारी रात्री उशीरापर्यंत तिन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले नव्हते.

बुडालेली ही तिन्ही मुलं चेंबूर परिसरातील असल्याची प्राथामिक माहिती आहे. ही मुलं समुद्रात जात असताना त्या ठिकाणी तैनात असलेला लाईफ गार्डचा जवानाने त्यांना आतमध्ये जाण्यापासून मनाई करत होते. मात्र हे तरी देखील ते समुद्राच्या लाटा मध्ये गेले अशी माहिती समोर येत आहे.

Mumbai Juhu Beach
सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं आवळला प्रेयसीचा गळा; सांगलीतील धक्कादायक घटना

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी देखील येथे इर्ला येथील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्यात मंगळवारी ही घटना घडल्याने समुद्र जीवरक्षक कुठे आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे अशा घटनांमधून कोणताही बोध न घेत अनेकदा तरुणाई बिनधास्तपणे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणतीही काळजी न घेतल्याने जीव गमावण्याची वेळ त्यांच्यावर येते.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com