Kurla: कुर्ला बलात्कार अन् हत्या प्रकरण : तरुणीवर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करून हत्या!

कुर्ल्यामध्ये एका अठरा वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकरण काल उघडकीस आले होते. प्रेमप्रकरणातून हि हत्या झाली आहे.
कुर्ला बलात्कार अन् हत्या प्रकरण : तरुणीवर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करून हत्या!
कुर्ला बलात्कार अन् हत्या प्रकरण : तरुणीवर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करून हत्या! Saam Tv

मुंबई : कुर्ल्यामध्ये HDIL (Kurla) कंपाऊडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या परिसरात काही तरुण इंस्टाग्राम रील साठी व्हिडीओ शूट करण्यासाठी इमारतीत गेले होते. त्यावेळी त्यांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली होती.

हे देखील पाहा :

या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून प्रेमप्रकरणातून हि हत्या झाली आहे. मृत तरुणीचे एका अठरा वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. यातून हि तरुणी प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र, प्रियकराला तिचा लग्नाचा प्रस्ताव मान्य नव्हता. त्याने याच रागातून तरुणीच्या हत्येचा कट आपल्या मित्रासह रचला. २३ तारखेला तरुणीला भेटण्यासाठी बोलावले आणि इथेच तिच्यावर बलात्कार (Rape) करून हत्या (Murder) केली. धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी अत्यंत क्रूरतापुर्वक तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. रेहान शेख व फैजल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

कुर्ला बलात्कार अन् हत्या प्रकरण : तरुणीवर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करून हत्या!
महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर तरुणीच्या शरीरावर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. देवनार पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद असल्याचं समजल्यानंतर मुलीची ओळख पटली आणि त्यानंतर तपासात आरोपी रेहान आणि फैजल या दोन आरोपींना शिवाजीनगर आणि कुर्ल्यातून अटक करण्यात आली. यातील एक आरोपी गोवंडी तर दुसरा एक कुर्ला येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

कुर्ला बलात्कार अन् हत्या प्रकरण : तरुणीवर हतोडा आणि चाकूने 26 वेळा वार करून हत्या!
आंतरराष्ट्रीय मोबाईल चोर टोळी नागपूर पोलिसांकडून जेरबंद!

आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच या आरोपींना 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलीस या घटनेत क्रूरपणे मारहाण केलेले हत्यार हतोडा आणि चाकू जप्त करणार आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 चे प्रणय अशोक यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com