मुंबईकरांसाठी बातमी! भिंत कोसळल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावर २ तासांचा Emergency ब्लॉक

मुसळधार पावसामुळे एका शाळेची भिंत रुळावर कोसळली आहे. त्यामुळे हा ढीगारा उचलण्याचे काम सुरू आहे.
mumbai local train
mumbai local trainSaam Tv

मुंबई: मुसळधार पावसामुळे (Rain) वडाळा ते सीएसटी या मार्गावर एका शाळेची भिंत कोसळली आहे. रुळावरील भिंतीचा ढीगारा उचलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे २ तासांचा आपत्कालीन ब्लॉक करण्यात आला आहे. ही शाळा रेल्वे रुळावर आहे या शाळेची भिंत जिर्ण झाली होती, त्यामुळे ती कोसळली आहे. त्यामुळे वडाळा ते सीएसटी या मार्गावर २ तास ट्रेन धावणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. (Mumbai Latest News)

mumbai local train
संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातले होते; संजय राऊतांचा हल्लाबोल

आज सकाळी मशीद रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ जीर्ण संरचनेचा छोटा भाग कोसळला आहे. कोसळलेल्या भागाचा ढिगारा तातडीने दूर करण्यात येत आहे . पण भिंतीचा उर्वरित भाग, संरचनेचा शिल्लक भाग काढून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे २ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेकडून बीएमसीला सर्व मदत केली जात आहे.

mumbai local train
Corona Cases India : झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने टेन्शन वाढवलं; अशी आहे देशातील सद्यस्थिती

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. प्रवाशांना दादर आणि कुर्ला मार्गे मेनलाइनवर प्रवास करण्याची परवानगी आहे. (Mumbai Latest News)

mumbai local train
Mumbai Rain: मुसळधार पावसाचा लोकलला फटका; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे १० ते २० मिनिट उशिरा

मुसळधार पावसाचा लोकलला फटका

दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता लोकल ट्रेनवर (Local Train) झाला आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते २० मिनिट उशिरा धावत आहेत. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे रेल्वे पटरीवरही पाणी साचले आहे, त्यामुळे रेल्वेगाड्या धावण्यास उशीर होत आहे. (Mumbai Local Train News)

मुसळधार पावसाचा (Rain) फटका लोकल ट्रेनला बसला आहे. तिनही मार्गावर धावणाऱ्या गाड्या १० ते २० मिनिट उशिरा धावणार आहेत. त्यामुळे सकाळी ऑफीससाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. सर्वच रेल्वेस्थानकांवर गर्दी झाल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com