Mumbai : वन विभागाची मोठी कारवाई; आरे कॉलनीतून दोन दिवसांत तीन बिबटे जेरबंद

गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी (Mumbai News) परिसरात वन विभागाने लावलेल्या सापळ्यात तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.
leopard
leopardSaam Tv

मुंबई : गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी (Mumbai News)  परिसरात वन विभागाने लावलेल्या सापळ्यात तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. युनिट नंबर 15 मध्ये दिवाळीच्या दिवशी दीड वर्षाचा मुलीवर हल्ला करणाऱ्या C-57 बिबट्याला अखेर आज सकाळी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मंगळवारी सकाळपासून एकूण तीन बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहे.

leopard
Mumbai Crime : मिठाईची ऑनलाईन ऑर्डर पडली महागात; महिलेची एक चूक अन् 2 लाख उडाले

या कारवाईमुळे आरे वसाहतीतील नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्यांकडून (Leopard) मानवी वस्तीतील हल्ले वाढल्यानंतर वनविभागाने कारवाईला सुरुवात केली होती. दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर वनविभागाने सलग कारवाई करून दोन मित्रांना जेरबंद केले होते.

मात्र यानंतरही बिबट्याकडून हल्ले सुरू होते. त्यामुळे वनविभागाने परिसरात पुन्हा शोधमोहिम राबवून कारवाईला सुरूवात केली. वनविभागाला मंगळवारी दिवसभरात दोन व्यक्तींना जेरबंद करण्यात आले. आज सकाळी वनविभागाने पुन्हा कारवाईला सुरूवात केल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला करणाऱ्या C-57 बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे.

leopard
Sanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरुपम मुंबई पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

गेल्या महिनाभरापासून आरे युनिट क्रमांक 15 मध्ये बिबट्याकडून हल्लासत्र सुरू असून हा बिबट्या वन विभागाच्या हातावर तुरी देत होता. या बिबट्यासाठी लावलेल्या सापळ्यात अन्य बिबटे वारंवार अडकत असले, तरी हवा असलेला संशयित बिबट्या मात्र वनविभागाच्या सापळ्यात अडकत नसल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला होता.

मात्र, आता बोरिवली वन विभागाचे टीमने आरे कॉलनी परिसरामध्ये ठिकठिकाणी ट्रॅप लावून आतापर्यंत पाच बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे आरे वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com