Mumbai News : सावधान! मुंबईत गोवरचा धोका वाढतोय; वडाळ्यात ५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंबईत गोवरने १५ वा बळी घेतला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या गोवर संशयित पाच महिन्यांच्या मुलाचा गोवरने मृत्यू झाला.
Measles Disease
Measles DiseaseSaam Tv

मुंबई : कोरोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच, मुंबईत गोवरने १५ वा बळी घेतला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या गोवर संशयित पाच महिन्यांच्या मुलाचा गोवरने मृत्यू झाला. या मुलाला सर्दी, खोकला, ताप, चेहरा तसेच छातीवर पुरळ अशी लक्षणे होती. (Latest Marathi News)

Measles Disease
Nawab Malik : नवाब मलिकांची तुरूंगातून सुटका होणार? जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

मुंबईत गोवर (Mumbai) रुग्णसंख्या वाढतच असून मंगळवारी दिवसभरात ११८ गोवर संशयित रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील एकूण गोवर संशयित रुग्णांची संख्या आता ४ हजार १८० वर पोहोचली आहे. तर गोवर निदान झालेल्यांची संख्या ३०८ झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी गोवर संशयित मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील गोवर संशयित मृतांचा आकडा १५ झाला आहे.

गोवरची लस तातडीने घ्या, महापालिकेचं आवाहन

मुंबई महापालिकेच्या वतीने पालिका दवाखाने, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत लस दिली जात आहे. गोवरची लस घेतली नसल्यास ती तातडीने घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, नियमित लसीकरणाबरोबर अतिरिक्त लसीकरण मोहिम वेगाने सुरू असून ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांना ‘अ’ जीवनसत्त्वच्या दोन मात्रा २४ तासांच्या अंतराने दिल्या जात आहेत.

Measles Disease
उत्तरप्रदेशात मोठी दुर्घटना! फर्निचर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

गोवर कशामुळे होतो?

गोवरचा संसर्ग हा नेमका कशामुळे होतो? हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल. गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो.

गोवरची लक्षणे कोणती?

प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com