Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी खुशखबर! रविवारी 'या' मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

Mumbai Local Megablock on Sunday: उद्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
Mumbai Local Megablock on Sunday
Mumbai Local Megablock on SundaySaam TV

Mumbai Local Megablock on Sunday: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मध्य रेल्वेने हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द केला आहे. रविवारी फक्त मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक हा शनिवारी रात्रीच घेतला जाईल, रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे गणेशोत्वासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Local Megablock on Sunday
Kurla Fire: कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग; धुरामुळे ३९ जण घुसमटले, बचावकार्य सुरू

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकल ट्रेनकडे पाहिलं जात. आठवडाभर मुंबईतील चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहचवणाऱ्या लोकल रेल्वेला प्रत्येक रविवारी आराम दिला जातो. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मेगाब्लॉक घेतला जातो.  (Latest Marathi News)

उद्या म्हणजेच १७ सप्टेंबरला देखील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, ठाणे ते कल्याण दरम्यानच हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. याशिवाय ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

दरम्यान, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील.

त्याचबरोबर कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या /अर्ध जलद सेवा कल्याण – मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील. पुढे त्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

दुसरीकडे, गोरेगाव आणि सांताक्रूझ अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर अप धीम्या मार्गावरील लोकल अंधेरी – खार रोड स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर चालवण्यात येतील.

मेगा ब्लॉक रद्द करण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढाची रेल्वेकडे विनंती

दरम्यान, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्सहार्बरवर घेण्यात येणारा ब्लॉक रद्द करण्यात यावा. अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापनाकडे केली होती. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवाणी यांनी देखील मेगा ब्लॉक न ठेवण्याचा आश्वासन लोढा यांना दिल्याची माहिती लोढा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Edited by - Satish Daud

Mumbai Local Megablock on Sunday
Traffic Updates: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com