मुंबई लोकल: येत्या रविवारी 'या' वेळेत असेल विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई लोकल: दिवा आणि ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६व्या लाइनच्या संदर्भात रविवार दि. २६.९.२०२१ रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
मुंबई लोकल: येत्या रविवारी 'या' वेळेत असेल विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई लोकल: येत्या रविवारी या वेळेत असेल विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकSaam Tv News

मध्य रेल्वेच्या दिवा आणि ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६ व्या लाइनच्या संदर्भात रविवार दि. २६.९.२०२१ रोजी कळवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी अप धीम्या मार्गाच्या स्लीविंगच्या संदर्भात मध्य रेल्वे रविवार दि. २६.९.२०२१ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० (१० तास) दरम्यान कळवा -मुंब्रा अप धीम्या मार्गादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

हे देखील पहा -

यामुळे ट्रेन चालण्याचा प्रकार खालीलप्रमाणे असेल:

१) कल्याण येथून सकाळी ७.२७ ते संध्याकाळी ५.४० पर्यंत सुटणाऱ्या अप मार्गावरील धीमी/अर्धजलद उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाईल, पुढे मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचेल.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या आणि सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

३) ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी शेवटची उपनगरीय सेवा सकाळी ७.३८ वाजता असेल.

४) ब्लॉकनंतर दिवा येथून कळवा आणि मुंब्रा स्थानकांसाठी पहिली उपनगरीय सेवा सायंकाळी ६.०२ वाजता असेल.

मुंबई लोकल: येत्या रविवारी या वेळेत असेल विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
नागपूरात कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा!; जेवणाला चक्क गोडधोड

या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील परंतु प्रवाशांच्या हितासाठी विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक प्रभावित क्षेत्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना बसची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.