Mega Block : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मुंबईत रविवारी मेगा ब्लॉक; जाणून घ्या पर्यायी मार्ग

मुंबईतील चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे.
mumbai mega block
mumbai mega block Saam Tv News

रुपाली बडवे

Mumbai Mega Block Local News : मुंबईतील चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. रविवारी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घोषित केला आहे. मेगा ब्लॉकमुळे लोकल ट्रेन १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. (Latest Marathi News)

mumbai mega block
'मी मित्राला घेऊन ताज हॉटेलमध्ये जेवायला...'; फडणवीसांनी सांगितला २६/११ हल्ल्याच्या दिवसाचा 'तो' किस्सा

मध्य रेल्वेच्या मांटुगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील.

ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच लोकल ट्रेन या निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

mumbai mega block
Pune PMPML News:पुण्यात ११ मार्गांवर पीएमपीएमएल बस सेवा होणार कायम बंद; ग्रामीण भागातील नागरीकांचा वाढणार त्रास

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे (Railway) प्रशासन दिलगीर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com