Mumbai News: सणासुदीत मिठाईत गडबड नको, नाहीतर... मुंबई महापालिकेचं कडक पाऊल

Mumbai Mahapalika Latest News: अधिकाऱ्यांनी मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असंही सांगण्यात आलं आहे.
Mumbai mahanagar palika Health Officers ordered to inspection sweet shops
Mumbai mahanagar palika Health Officers ordered to inspection sweet shopsSaam TV

Mumbai Mahapalika Latest News: गणेशोत्वस आणि नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकांनी या उत्सवाची तयारी केली आहे. अशातच सणासुदीच्या कालावधीत मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक आरोग्य अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षकांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.(Latest Marathi News)

येत्या सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

Mumbai mahanagar palika Health Officers ordered to inspection sweet shops
Maratha Andolan: बाबा... तुमचं पोरगं लय भारी; CM शिंदे जरांगे पाटलांच्या वडिलांना काय म्हणाले?

तसेच आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांनी त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असंही सांगण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत असते. त्याच अनुषंगाने मुंबई शहरात मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा (Food Poisoning) होऊ नये म्हणून महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपआपल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतची भित्तीपत्रकांचे वाटप करावे व जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर मिठाईचा रंग बदलत असल्यास अथवा उग्र वास येत असल्यास किंवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असंही आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.

Edited by - Satish Daud

Mumbai mahanagar palika Health Officers ordered to inspection sweet shops
Pune Breaking News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने दिला तडकाफडकी राजीनामा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com