Mumbai Crime News: लोकांना दहशत दाखवण्यासाठी गावठी कट्टा घेऊन मालवणीत फिरला; अखेर पोलिसांनी दाखवला इंगा, आवळल्या तरुणाच्या मुसक्या

मुंबईच्या मालवणी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे
mumbai  Crime News
mumbai Crime NewsSaamTv

संजय गडदे

Mumbai Crime news: मुंबईच्या मालवणी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संदेश कृष्णा पाटील (32 वर्ष) असून तो मालवणी चिकूवाडी परिसरात राहणारा आहे.

तर गावठी कट्टा पुरवणाऱ्या अक्षय पाठक याचा मालवणी पोलीस शोध घेत आहेत. या दोघांविरोधात कलम- 3(25) आर्मस ॲक्ट सह 37(1) (अ)135 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील एकता वेल्फेअर सोसायटीच्या परिसरातील रिक्षा पार्किंगमध्ये एक तरुण दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून कळाली.

यानंतर वपोनि शेखर भालेराव व रात्रपाळी पोनि ईरफान शेख यांच्या आदेशाने समजलेल्या ठिकाणावर जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता संशयास्पदरीत्या एक तरुण आढळून आला त्याला हटकले असता अंधाराचा फायदा घेवून पळू लागला.

mumbai  Crime News
Beed Crime News: बीड हादरले! हत्या करुन महिलेचा मृतदेह विहिरीत फेकला, गावात उडाली खळबळ...

मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सपोनि. निलेश साळुंके निलेश साळुंके,अनिल पाटील, सचिन वळतकर,विलास आव्हाड,नवनाथ शिंदे,अरूण राठोड यांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास चॅपल मैदानाजवळून ताब्यात घेतले.

त्याची झाडाझडती केली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा बेकायदेशीररित्या आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता परिसरात दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगल्याचे त्याने सांगितले. हा कट्टा त्याने त्याचा मित्र अक्षय पाठक यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले.

mumbai  Crime News
Mumbai Crime News: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला नगरमधून अटक!

अटक करण्यात आलेला आरोपी संदेश कृष्णा पाटील हा गुन्हे अभिलेखावरील गुन्हेगार असून अनेक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा दुसरा साथीदार अक्षय पाठक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com