Mumbai Mega Block : मुंबई लोकल प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! रविवारी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या कोणत्या मार्गावर असेल मेगाब्लॉक?

Mumbai Mega Block : मुंबईत मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर रविवारी दिनांक 12 मार्च रोजीअभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असणार आहे.
Mumbai Mega Block
Mumbai Mega BlockSAAM TV

Mumbai Mega Block : मुंबईत मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर रविवारी दिनांक 12 मार्च रोजीअभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढील असलेल्या या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

Mumbai Mega Block
Sadanand Kadam: मोठी बातमी! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक; अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ४ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर सेवा पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल. (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.

Mumbai Mega Block
Kirit Somaiya: अनिल परब आक्रमक! किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ? 'नाहक बदनामी झाल्याचे सांगत थेट...'

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Mumbai Local)

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत असे म्हणत प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com