Mumbai Mega Block : रविवारी 'या' रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; असा असेल मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईन (harbour line) विभागांत मेगाब्लॉक घोषित केला आहे.
mumbai mega block news
mumbai mega block news saam tv

सुमित सावंत

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईन (harbour line) विभागांत मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर मध्य रेल्वेच्या (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कल्याण मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) नसणार आहे. (Mumbai Mega Block News In Marathi)

mumbai mega block news
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बाळासाहेब यांचे नातू निहार ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चांना उधाण

या ब्लॉककालावधित ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणार्‍या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

mumbai mega block news
Arjun Khotkar| शिंदे गटात की उद्धव ठाकरेंसोबत?; अर्जुन खोतकर यांचं ठरलंय, उद्याच निर्णय

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला या स्थानकादरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com