Mumbai Metro : मोठी बातमी! मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत, कुणाकुणाला मिळणार सूट? जाणून घ्या

मोठी बातमी! मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत, कुणाकुणाला मिळणार सूट? जाणून घ्या
Mumbai Metro
Mumbai MetroSaam Tv

>> संजय गडदे

Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत दिली जाणार आहे. (Latest Marathi News)

Mumbai Metro
ANI Twitter Locked : ट्विटरने 'एएनआय'चे अकाउंट केले लॉक, जाणून घ्या काय आहे कारण

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे.

Mumbai Metro
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलकांना जामीन; कोर्टानं घातली महत्वाची अट

कोणाला सवलत मिळेल?

ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या ३ श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com