उद्धव ठाकरेंना इगो बाजूला ठेवा असं वारंवार सांगितलं होतं - देवेंद्र फडणवीस

'आरे येथील मेट्रो कारशेडचं २५ टक्के काम झालं आहे, उर्वरीत ७५ टक्के देखील लवकरच होईल.'
Devendra Fadnavis  Uddhav Thackeray News
Devendra Fadnavis Uddhav Thackeray NewsSaam TV

सुशांत सावंत -

मुंबई: आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मेट्रोकारशेडबाबत नवनिर्वाचित सरकारकडे एक मागणी केली होती. ठाकरे यांच्या याच मागणीवर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, 'मेट्रोचे (Mumbai Metro) खूप काम झालं आहे. मात्र, कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरु होणार नाही. शिवाय ठाकरे सरकाने सुचवलेली कांजूरमार्ग येथील जागा वादात आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या जागेवर आता काम सुरु केलं तरी ते पुर्ण व्हायला जवळपास ४ वर्ष लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड त्याच ठिकाणी करणार असल्याचं सांगत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळली आहे.

पाहा व्हिडीओ -

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाभवन (Shivsena Bhavan) येथील पत्रकार परिषदेत मेट्रोकारशेडच्या (Metro Carshed) मुद्द्यावरुन नवनिर्वाचित सरकारकडे मागणी केली होती. ठाकरे म्हणाले होते, मला एकाच गोष्टीचं दु:ख झालं आहे ते म्हणजे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय, हवंतर माझावर राग काढा, मुंबईवर राग काढू नका, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. मेट्रोशेडबाबतचा निर्णय बदलू नका.

भाजपने मागे जंगलाची कत्तल केली त्यावेळी मी कांजूरमार्गाचा (Kanjurmarg) पर्याय सुचवला होता. आता देखील मी पर्यावरणवाद्यांसोबत आहे. कृपा करुन माझ्यावरचा राग कांजूरमार्ग मेट्रोकार शेडवर काढू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो आरेचा आग्रह रेटू नका. पर्यावरणाचा ऱ्हास करु नका अशी विनंत केली होती.

याच पार्श्वभूमिवर आज देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत आपण आरे येथेच मेट्रो कारशेड उभारणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी फडणवीस यांनी सांगितलं, आरे येथील जागेला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. शिवाय या ठिकाणचं २५ टक्के काम या आधीच झालं आहे. उर्वरीत ७५ टक्के देखील लवकर होईल.

मुंबईकरांच्या (Mumbai) सेवेत मेट्रो लवकर सुरु करायची असलेल तर कारशेड आरे येथेच व्हावं अशी आमची भूमिका आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांचा आदर राखून सांगतो त्यांचा निर्णय चुकीचा आहे. आपला इगो बाजूला ठेवा आणि कारशेड आरेमध्येच होऊ द्या अशी विनंती आम्ही त्यांना वारंवार केली असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.

कारशेड बाबत केस झाली, हाय कोर्ट सुप्रीम कोर्टात सहमती भेटल्यावर देखील याला विरोध करण्यात आला. जंगल तोडण्याची गोष्ट नव्हती, शिवाय बिल्डरांना तुम्ही झाडं तोडायला कशी परवानगी दिली असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय तोडलेली झाडं पुर्ण आयुष्यात जेवढा कार्बन डाय ऑक्साइड (Carbon dioxide) संपवतील तेवढाच कार्बन डाय ऑक्साइड मेट्रो ८० दिवसांत कमी करेल. त्यामुळे हा राजकारणाचा मुद्दा करु नका. मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही कारशेड तिथेच करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com