Mumbai MHADA Lottery 2023: प्रतीक्षा संपली! हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, मुंबईतल्या 4083 घरांची 18 जुलैला सोडत

Mhada Lottery: मुबंईतील म्हाडाच्या 4,083 घरांची जाहिरात येत्या सोमवारी म्हणजे 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे.
MHADA Lottery 2023
MHADA Lottery 2023Saam TV

Mumbai News: मुंबईमध्ये हक्कांचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे. या घरांसाठी वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची सोडत ( Mumbai MHADA Lottery 2023) लवकरच होणार आहे. येत्या 18 जुलै रोजी मुंबईतल्या म्हाडाच्या 4083 घरांची सोडत (MHADA Lottery) काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाची ही घरं पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड आणि दादर या परिसरात असणार आहेत.

MHADA Lottery 2023
Chikhali Marriage Fight: लग्नातील डीजेवरून वाद पेटला, चिखलीत दोन गटात तुफान हाणामारी; २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

मुबंईतील म्हाडाच्या 4,083 घरांची जाहिरात येत्या सोमवारी म्हणजे 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. या दिवसापासूनच नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 26 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छानणी करून पात्र अर्जदारांची यादी जारी केली जाईल.

18 जुलै रोजी या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिमच्या रंगशारदा सभागृहामध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिद बोरीकर यांनी दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळाची शेवटची सोडत 2019 मध्ये झाली होती. त्यात फक्त 217 घरांचा समावेश होता. त्यानंतर आता जुलैमध्ये घरांची सोडत काढणअयात येणार आहे.

MHADA Lottery 2023
Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, सत्य शोधण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई मंडळाच्या 18 जुलैच्या सोडतीत 4083 घरांचा समावेश आहे. त्यामध्ये अत्यल्प गटासाठी 2,788, अल्प गटासाठी 1,0 22, मध्यम गटासाठी 1,32 आणि उच्च गटासाठी 39 घरांचा समावेश असणार आहे. या सोडतीमध्ये किमान क्लस्टरमध्ये गोरेगावच्या पहाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील 1,947 घरे, अँटॉप हिलमध्ये 417 आणि विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये 4,24 घरे अशी एकूण 2 हजार 788 घरे असणार आहेत. तर लहान क्लस्टरमध्ये एकूण 1,022 घरे आहेत आणि गोरेगावच्या डोंगराळ भागात 736 घरे यांचा समावेश असणार आहे.

महत्वाच्या तारखा आणि ठिकाण -

- मुंबई मंडळाच्या घरांची जाहिरात - 22 मे 2023

- अर्ज विक्री-स्वीकृतीची तारीख - 22 मे 2023

- अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 22 जून 2023

- घरांची सोडत काढण्याची तारीख - 18 जुलै 2023

- सोडत काढण्याचे ठिकाण - रंगशारदा सभागृह, वांद्रे (पश्चिम)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com