Mumbai Fire News : मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात आगीचा भडका; अग्निबंब घटनास्थळी

मुंबईच्या मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाला भीषण आग लागली आहे.
Mumbai Fire News
Mumbai Fire News Saam tv

मुंबई : मुंबईच्या मुलुंडमधून आगीचं वृत्त समोर आलं आहे. मुंबईच्या मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. आर मॉलमागील दोन मजली असलेल्या या रुग्णालयाला आग लागली आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील आर मॉलमागील दोन मजली असलेल्या अग्रवाल रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेनंतर रुगणालयामधील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

त्यामुळे रुग्णांवरील मोठं संकट टळलं. तर आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाचे वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

Mumbai Fire News
Maharashtra Politics : एकदा नाही शंभर वेळा...; रामदास कदम यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर आगपाखड

नेमकं काय घडलं?

मुलुंडमधील दोन मजली असलेल्या अग्रवाल रुग्णालयाला आग (Fire) लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ घबराट उडाली. घटनास्थळी काही नागरिक, कर्मचारी रुग्णांना आगीपासून वाचवण्यासाठी धावले. त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची स्थिती सुखरूप राहिली.

Mumbai Fire News
Viral Video: ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेल्या धडधाकट व्यक्तीचा क्षणात मृत्यू, धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

तर आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी थेट रुग्णालायत प्रवेश करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या घटनेत रुग्णालयाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com