मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणार?

आगामी पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्ह
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटकाSaam Tv

मुंबई - महानगरपालिका सभागृह पंचवार्षिक योजनेनुसार मार्च महिन्यात विसर्जित होणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी नव्याने निवडणूका घेऊन नवीन सभागृह बसणं गरजेचं आहे. पण मुंबईत निवडणुकांना विलंब होणार असल्यामुळे मुंबईत काही काळ प्रशासक लागण्याची शक्यता आहे. कारण आगामी पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चिन्ह आहेत.

राज्य शासनाने मुंबई महापालिकेत ९ नगरसेवकांची वाढ करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे या जागा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुके मुंबईतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ होणार आहे.

हे देखील पहा -

या जागा वाढवतानाच सर्व प्रभागात लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होणं गरजेचं आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा सर्व प्रभागांचा लोकसंख्येनुसार नवीन प्रभाग रचना करून कच्चा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. या अहवालात सुधारणा करून अमलबजावणी होण्यास आणखी विलंब होऊ शकणार आहे. असं झाल्यास फेब्रुवारीत होऊ घातलेल्या निवडणुका आणखी महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका
डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग...

निवडणूक आयोगाकडून पालिकेने नव्याने प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा तयार करून तो अहवाल सादर केल्या नंतर त्यावर सुधारणा करून अमलबजावणी होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे . असं झाल्यास निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्या नंतर पालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडतीला थोडा वेळ लागले . ही सोडत काढल्यानंतर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकूणच सगळ्या प्रक्रिया पाहता मुंबई महापालिकेच्या निवडणुका एक महिना उशिराने होणायची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com