धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या शिपायांचे गोरखधंदे पहा व्हिडिओ

महापालिकेच्या डी विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून पालिकेकडून कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची कामे मिळवल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या शिपायांचे गोरखधंदे पहा व्हिडिओ
धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या शिपायांचे गोरखधंदे पहा व्हिडिओ सुमित सावंत

सुमित सावंत

मुंबई : महापालिकेच्या Municipal Corporation डी D विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी Company स्थापन करून पालिकेकडून कोरोना Corona काळात कोट्यवधी रुपयांची कामे मिळवल्याचे समोर आले आहे. मुंबई Mumbai महापालिकेमधील घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई अर्जून नराळे आणि मेंटेनंस विभागातील शिपाईपदावरचे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नींच्या नावाने कंपनी सुरु केली. Mumbai Municipal Corporation peon black business

अर्जून नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या, श्री एंटरप्रायजेस Enterprises आणि या कंपनी मध्ये गेल्या दीड वर्षामध्ये १ कोटी ११ लाख रुपयांची कामे मिळवली आहेत. तर रत्नेश भोसलेच्या पत्नी रिया भोसले याना आर आर एंटरप्रायजेस कंपनीला ६५ लाख रुपयांची कामे मिळावली होती. मुंबई महापालिका अधिनियमानुसार पालिकेमधील सेवेत असलेल्या, व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाला पालिकेची अशी कंत्राटे घेता येत नसतात.

पहा व्हिडिओ-

परंतु या दोघांनी मात्र, नियम धाब्यावर बसवत. स्वत:च्या पत्नींच्या नावाने कंपनी काढून कोट्यवधींची कामे मिळवली आहेत. महानगरपालिकेच्या डी विभागा मध्ये कोरोना काळात कोणतेही वस्तू लागली तरी, ते पुरवठा करण्याचे काम या २ कंपन्यांनी केले आहे. स्क्रू ड्रायव्हरपासून कॉम्प्यूटरमधील पार्टपर्यंत तर टेबलपासून भाड्याने गाड्या देण्यापर्यंत सर्व काही पुरवठा या २ कंपन्यांनी केले आहे. Mumbai Municipal Corporation peon black business

धक्कादायक! मुंबई महापालिकेच्या शिपायांचे गोरखधंदे पहा व्हिडिओ
शिवसेना-मनसेच्या  कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड 

यामध्ये कोविड Covid सेेंटरमधील रुग्णांना लागणा-या ऑक्सिमीटर, इलेक्ट्रीक केटल, स्टीमर या वस्तुंचा पुरवठा देखिल त्यांनी यावेळी केले आहे. रत्नेश भोसले आधी डी विभागात होते, आता बांद्राला एच पश्चिम विभागात सध्या ते कार्यरत आहेत. चतुर्थश्रेणीतील २ कामगार एवढे मोठे धाडस कस करतील, यामध्ये अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याशिवाय हे करणे शक्य नाही. कोरोनाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या वॉर्ड मधील खरेदी करण्यात आलेली आहे. या सर्व खऱेदी व्यवहाराची चौकशीची गरज आता व्यक्त होवू लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com