मुंबई NCB ची मोठी कारवाई 2 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी 'या' कंपनीच्या मालकाला अटक

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं मागील महिन्यात २ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचा भांडाफोड केला होता.
NCB Raid in mumbai
NCB Raid in mumbaiSaam TV

अंबरनाथ: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स (NCB) सेलनं ऑगस्ट महिन्यात नालासोपारा आणि गुजरातमधून मिळून १ हजार २१८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या प्रेम प्रकाश सिंग याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. विज्ञान शाखेतील ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पदवीधर असलेला सिंग हा स्वतः हे ड्रग्ज तयार करत होता.

त्याच्या चौकशीत त्यानं अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील (MIDC) नमाऊ केम या केमिकल कंपनीत ड्रग्ज (Drugs) तयार केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार अँटी नार्कोटिक्स सेलनं या कंपनीवर छापा टाकला होता. तेव्हापासून या कंपनीचा मालक असलेला जीनेंद्र व्होरा हा अँटी नार्कोटिक्स सेलच्या रडारवर होता.

पाहा व्हिडीओ -

अखेर त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला १० सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावत बेड्या ठोकल्या. त्याच्या कंपनीतील व्यवस्थापक किरण पवार याला अँटी नार्कोटिक्स सेलनं यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, व्होरा याला विशेष एनडीपीएस कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती अँटी नार्कोटिक्स सेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.

NCB Raid in mumbai
Mumbai Fire: मुंबईतील कूपर रुग्णालयाला मोठी आग; सुदैवाने जीवितहानी नाही

व्होरा याच्या कंपनीत प्रेम प्रकाश सिंग यानं ४ वेळा एमडी ड्रग्ज तयार केलं आणि त्यामोबदल्यात व्होरा याला मोठी रक्कम दिली गेली. तसंच कंपनीतील कर्मचाऱ्यांना याबाबत संशय आला होता. मात्र, आपण काय तयार करत आहोत, याची माहिती व्होरा आणि त्याचा व्यवस्थापक किरण पवार याने कर्मचाऱ्यांनाही दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच नमाऊ केम कंपनीतून एमडी ड्रग्जचे काही नमुने जप्त केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे केमिकल कंपन्यांवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com